Tiranga Times Maharastra
केंद्र सरकारने सुरू केलेल्या सुविधेमुळे नागरिकांना अवघ्या काही मिनिटांत डिजिटल स्वरूपात पॅनकार्ड मिळू शकते.
आजच्या काळात पॅनकार्ड केवळ कर भरण्यासाठीच नव्हे, तर बँक खाते उघडणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे, गुंतवणूक तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यावश्यक बनले आहे. त्यामुळे पॅनकार्ड नसल्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
ही तात्काळ पॅनकार्ड सुविधा आधारशी जोडलेल्या माहितीनुसार दिली जाते. आवश्यक अटी पूर्ण असल्यास अर्ज केल्यानंतर काही मिनिटांतच ई-पॅन उपलब्ध होतो. हा ई-पॅन त्वरित वापरता येतो आणि तो पूर्णपणे वैध असतो.
सरकारच्या या सुविधेमुळे नागरिकांचा वेळ वाचत असून, पॅनकार्डसाठी लागणारी कागदपत्रांची झंझटही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
#TirangaTimesMaharastra
#InstantPAN
#PanCardUpdate
#GovernmentService
#DigitalIndia
#MarathiNews
